⚜️💫माझी आई🥀⚜️

 ⚜️💫माझी आई🥀⚜️



       नऊ रंगाच्या नऊ साड्या आईने कधी घातल्याच नाही. नऊ दिवसाचे कडक उपवास करून पण देव तिला कधी पावलाच नाही, तरी माझ्या आईच्या चेहर्‍यावरचे हसू कधी ढळले ही नाही. फाटक्या संसाराची ठिगळं जोडता जोडता केस पांढरे झालेले कळलेच नाही. आयुष्यातील दुःखाची वादळे झेलत ती कुणापुढे झुकली नाही, रडली पण नाही म्हणुनच मला माझी आई देवी देवता पेक्षा कधी कमी वाटलीच नाही. 
  नवरात्रीत देवी बद्दल सगळे काही ना काही लिहितात.. पण जिने मला जन्म दिला, माझ्यावर चांगले संस्कार केले, माझ्या आयुष्यात सुंदर रंग भरले, अशा माझ्या देव स्वरूप आईला कोटी कोटी प्रणाम!                                                              
                 ‼️आई‼️