⚜️श्रेष्ठ कोण⚜️

 ⚜️श्रेष्ठ कोण⚜️


      फोटो मधील दोन साप आहेत. एक अजगर हा दुसरा किंग कोब्रा. दोघेही शारीरिक दृष्ट्या मोठे आहेत आणि दोघांना वाटते की मीच श्रेष्ठ आणि शक्तिशाली आहेत. दोघे ही आपल्याला ताकतीचा फायदा करून जिथे तिथे आपला दबदबा बनवून ठेवत असतात. परंतु प्रत्येक क्षणी आपली शक्तीचा उपयोग करणे हे च योग्य असते असा गैरसमज यांच्या मनात मात्र ठाम बसला असेल आणि एका क्षणी अजगर किंग कोब्राचा समोरासमोर आल्या नंतर अजगर किंग कोब्राचा गळा दाबतो आणि किंग कोब्रा अजगराला चावतो. दोन्ही साप मरण पावतात, एक गळा दबल्याने आणि दुसरा विषबाधेने. यात दोघांनी ही फक्त समोरच्याला मारण्याचा किंवा आपली ताकत दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांनी ही स्वतः ला वाचवण्याचा किंवा मला काही नुकसान होऊ नये याचा विचार केला नाही आणि परिणाम दोघांना भोगावे लागले.
       आणि अशा प्रकारे समाजात देखील लोक एकमेकांचा नाश करतात. अशा प्रकारे मैत्री संपते, नातेसंबंध संपतात आणि मत्सर वाढतो. कारण प्रत्येकाला नेहमी इतरांपेक्षा चांगले व्हायचे असते किंवा स्वतःला मोठे किंवा बलवान सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो.
    काही लोक त्यांच्या श्रेष्ठत्वाच्या अभिमानाने जमिनीवर झुकत नाहीत, त्यांची शक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि गपशप, मत्सर आणि फसवणूक करतात जोपर्यंत ते एकमेकांना दुखावत नाहीत किंवा संपवत नाहीत.

तात्पर्य:- राग, द्वेष, मत्सर, आणि अहंभव वगळून प्रेम, करुणा, निष्ठा आणि प्रामाणिकपणा निवडा जेणेकरून स्वतःचे कल्याण होईल आणि सर्वांचे कल्याण होईल.