⚜️प्रत्येकालाच वाटते कि.....⚜️

 ⚜️प्रत्येकालाच वाटते कि.....⚜️ 

     प्रत्येकालाच वाटते आपणास इतरांनी मोठे व चांगले म्हणावेत परंतु...
     आपल्यास केवळ अश्या वाटण्याने आपणास मोठेपणा मिळतं नाही. तर समाज कोणालाही सहजासहजी मोठेपण किंवा चांगलेपण देत नाही तर त्या व्यक्तीचे वर्तन, विचार, कार्य याचे अवलोकन करूनच शिक्कामोर्तब करीत असतो. परंतु बऱ्याचवेळा कांहीं आमिष, प्रलोभन याला बळी पडून किंवा कोणाचातरी दबाव , दहशतीमुळे नाईलाजास्तव एखाद्याला समाज मोठा म्हणत असतो. तसेच ज्याच्याकडे सत्ता, अधिकार असते, अश्याना इच्छा नसतानाही मोठे म्हंटले जाते ते केवळ स्वार्थापोटी असते.
    खरोखरच एखादा निती नियमाचे पालन करणारा, सत्य बोलणारा, बोलल्याप्रमाणे व्यवहार करणारा, सदवर्तनी असेल तर तो सत्ताधीश असेल नसेल, त्याच्याकडे आर्थिक संपती आहे किंवा नाही याचा विचार न करता लोक त्याला मोठेपणा देत असतात, आणि अश्या मोठ्या लोकांकडूनच समाजाला योग्य दिशा, सहकार्य व मार्गदर्शन मिळू शकते. असे असले तरी अनेक लोक स्वतःची योग्यता व पात्रता नसताना लोकांनी आपणास मोठे, चांगले म्हणावे, आपला सन्मान करावा, म्हणून कोणत्याही थराला जाऊन प्रयत्न करतात. यासाठी प्रसंगानुसार दमदाटी, दहशत आसे अनेक गैरप्रकार याबरोबर रडण्याचे नाटक, लोटांगण घालून मोठेपणा मिळविण्याचा प्रसंगानुसार प्रयत्न करीत असतात.
    अशाप्रकारे विविध क्षेत्रात आज अनेक लोक नको त्या पदावर, नको त्या ठिकाणी, आरूढ होऊन मोठेपणाने मिरवत असल्याचे पहावयास मिळत आहे . त्या पदाच्या प्राप्तीसाठी हे लोक सर्व निती नियम पायदळी तुडवलेले असतात. त्यांना निती नियम याची कसलीच भिती, लाजलज्जा, मानअपमान याचे कांहीच वाटत नाही. केवळ आपल्याला मोठेपणा मिळावा व तो मिळाल्यास टिकून रहावा यासाठी वाट्टेल ते करण्याची यांची तैयारी असते. यासाठी ते त्यांच्या विरोधकांशी दोस्ती करून सोबत असलेल्या अनेक  सहकारी मित्र याना दूर सारून,   सामान्याचे समोर लोटांगण घालण्यासाठी किंवा त्याना पायदळी तुडवून जाण्यासाठी मागेपुढे पहात नाहीत. 
   यां लोकांना निती नियमाचे पालन करीत स्वकष्टाने प्रामाणिक पणाने व्यवहार करणारे स्वाभिमानी सज्जन लोकांना अश्या लोकांची दोस्ती किंवा दुष्मणी करणे परवडणारी नसते. म्हणून असे लोक याच्यां पासून अंतर ठेऊन राहणेच पसंत करतात आणि तसे अंतर ठेऊन राहणचे चांगले असते. परंतु समाजातील कांही लोक केवळ स्वार्थासाठी  अश्याना डोक्यावर घेऊन नाचतात, त्यांना आदर्शवत मानून स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचे अनुकरण करीत समाजातील इतराना सुद्धा यासाठी प्रोत्साहित करीत असतात, आणि खऱ्या चांगल्या लोकांकडे दुर्लक्ष करतात याचे मात्र आश्चर्य वाटते.
     .समाजात अनेक लोक निःपक्ष व निस्वार्थ राहून आपापल्या स्थरावर समाजाला योग्य ती दिशा देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासठी रात्रंदिवस झटत असतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून लोक अश्या खोटारड्या  लोकाच्या मागे धावतात याचे दुःख वाटते. 
माणसाने उताविळपनाने मोठेपणाचे मागे लागणे योग्य नाही. आपले कृतुत्वच आपणाला मोठेपण मिळवून देत असते. चुकीच्या मार्गाने मिळविलेला मान, मोठेपणा हा जास्त काळ टिकत तर नाहीच पण यामुळे समाजाचे मात्र खूप मोठे नुकसान होत असते . कृतूत्व, धीर, धैर्य व योग्यताच आपल्याला हि-यासारखे समाजात चमकवू शकतात जे कायम असते. यामुळे आपल्या बरोबरच समाजाचे सुद्धा हीत साधले जाते म्हणून...

   सामान्य वर्गीय सुजान समाज बांधव व तरुण मित्रानो...                
  लोकांनी आपणास मोठे म्हणोत किंवा नाही, आपण आपल्या कर्तव्यात कसूर न करता निती नियमाचे पालन करून प्रामाणिकपणे आपले व्यवहार करावेत, तोच खरा मोठेपणा आहे. त्यातच खरे सुख, समाधान आहे.
    स्वार्थी मोठेपण हे मागून मिळतं नाही तर ते आपल्या सदवर्तनातूनच मिळत असते. त्यामुळे कोणीही खोटारड्या किंवा दिखाऊ मोठेपणाचे मागे लागून तो मिळविण्याचा प्रयत्न तर करू नकाच पण खोट्या मार्गाने विविध पद्धतीचा अवलंब करून मोठेपणा मिळविणाऱ्याचा जयजयकार करून, किमान अश्या प्रवर्तीच्या लोकांना प्रोत्साहित तरी करू नये , ज्यामुळे स्वतःसह समाजाचीही फसवणूक होणार नाही असे सांगावेसे वाटते.                      
               
🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. पण लोकशाही  व संविधान जिवंत ठेऊन वाचवा.
🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका, वाद  वाढऊ नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे.
 🌺समाजातील खोट्या, राजकारणी व स्वार्थी, मतलबी आणि विश्वास घातकी लोकांपासुन नेहमीच दूर रहा, खोट्या अफवानवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.
🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी, केव्हा आणि कुठे कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा."



⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
babanauti16.blogspot.com  
📞9421334421