⚜️आई आणि सात कोडी⚜️

 ⚜️आई आणि सात कोडी⚜️

सात कोड्यांना आईने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे
  • १.या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..?
       मुले म्हणाली , तलवार...
आईने सांगितले.. जीभ.. 
   कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसऱ्याचा अपमान करतो, दुसऱ्याला दुखावतो,  दुसऱ्याच्या भावनांना धक्का पोचवतो.

  • २. या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..?
      एकजण म्हणाला, सूर्य, चंद्र, आकाशगंगा...
आई म्हणाली...भूतकाळ. 
   माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे.

  • ३. या जगातील सगळयात मोठी गोष्ट कोणती..? 
        दुसऱ्याने सांगितले की, पृथ्वी, पर्वत, सूर्य. 
आई म्हणाली, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे.. हाव. 
   लोक दुःखी होतात, त्यामागील कारण त्यांच्या मनातील न संपणारी हाव. ही हाव पूर्ण करण्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. त्यामुळे हाव करताना काळजी घ्या.

  • ४. पृथ्वीवर सगळ्यात वजनदार वस्तू कोणती...?
         तिसऱ्याने उत्तर दिलं... पोलाद, लोखंड, हत्ती.
आई म्हणाली,  सगळ्यात कठिण वस्तू... वचन. 
   वचन देणे सोपे असते पण ते पाळणे कठिण.
  • ५.पृथ्वीवरील सगळ्यात हलकी वस्तू कोणती..?
       चौथा म्हणाला .. कापूस, हवा, धूळ, पाने.
आई म्हणाली, सगळीकडे मी आणि मीपणा हलका असतो.
   पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणाऱ्यांकडे पहा. काही जणांनाच हा मीपणा सोडता येतो.
  • ६.पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती..? 
         पाचव्याने सांगितले, आई, वडिल, मित्र, नातेवाईक.
आई म्हणाली, माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे 'मृत्यू'.कारण कुठल्याही सेकंदाला मृत्यू येण्याची शक्यता असते.
  • ७.शेवटचा प्रश्न..या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती...?
      मुले म्हणाली, खाणे, झोपणे, फिरायला जाणे.  
आईने नम्रतेने सांगितले सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देणे.


⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
babanauti16.blogspot.com  
📞9421334421