⚜️श्रध्दा⚜️

⚜️श्रध्दा⚜️ 

  एकदा भगवान श्रीकृष्णांना जेवणासाठी उशीर झाला, रुक्मिणीने कारण विचारले असता भगवान म्हणाले, 'एकजण जेवण करायचा राहिला होता. यावर रुक्मिणी म्हणाली, आपण सर्वांच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे का?' भगवंतांनी होकारार्थी उत्तर दिले. रुक्मिणीने कुंकवाच्या डबीत एक कीडा बंद करून ठेवला. दुसऱ्या दिवशी भगवान जेवणासाठी आले तेव्हा रुक्मिणीने विचारले, 'सर्व प्राणीमात्रांना भोजन मिळाले का ? भगवान श्रीकृष्णांनी होकारार्थी उत्तर दिल्यावर रुक्मिणीने कुंकवाची डबी उघडली तर डबीतील किड्याच्या तोंडात तांदळाचा दाणा होता. डबी बंद करताना रुक्मिणीच्या कपाळी असलेल्या कुंकूम तिलकावरून तो तांदळाचा दाणा डबीत पडला होता. भगवान हसले व म्हणाले,'रुक्मिणी! ज्याची केवळ माझ्यावरच श्रद्धा आहे त्याचे जेवणच काय, सर्वच गोष्टींचे दायित्व मी स्वीकारत असतो.!
तात्पर्य : कर्ता करविता तो एकच ईश्वर आहे त्याच्या आज्ञेशिवाय पान सुध्दा हलत नाही  फक्त मनापासून श्रध्दा  व विश्वास असावा मग सुख असो वा दुःख!! परमेश्वर तुमची कधीच साथ सोडणार नाही.