⚜️पंचाक्षरी⚜️
पाय जपावा - वळण्याआधी
तोल जपावा - ढळण्याआधी
अन्न जपावे - विटण्याआधी
नाते जपावे - तुटण्याआधी
शब्द जपावा - बोलण्याआधी
अर्थ जपावा - मांडण्याआधी
रंग जपावे - उडण्याआधी
मन जपावे - मोडण्याआधी
वार जपावा - जखमेआधी
अश्रू जपावे - हसण्याआधी
श्वास जपावा - पळण्याआधी
वस्त्र जपावे - मळण्याआधी
द्रव्य जपावे - सांडण्याआधी
हात जपावे - मागण्याआधी
भेद जपावा - खुलण्याआधी
राग जपावा - भांडणाआधी
मित्र जपावा - रुसण्याआधी
मैत्री जपावी - तुटण्याआधी!
मस्त जगावे - मरण्या आधी!
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421