⚜️जिंकले तर पन्नास, हरले तरी दहा⚜️

⚜️जिंकले तर पन्नास, हरले तरी दहा⚜️

      एका मोठ्या तळ्याच्या मालकाने तळ्यावर एक स्पर्धा लावली. "शेकडो मगरी असलेल्या या तळ्यात जो कोणी एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सुरक्षित पोहून जाईल... त्याला 50 लाखाचे बक्षीस मिळेल. आणि जर का यात तो मगरींकडून मारला गेला... तरी  त्याच्या वारसाला 10 लाख मिळतील".  
    तिथे आलेल्या शेकडोपैकी एकही माणूस हे आव्हान स्विकारायला तयार नव्हता. पण काही वेळेनंतर अचानक एकाने तळ्यात उडी मारली. त्याला पकडायला आलेल्या मगरींचा जीवघेणा पाठलाग पाहून जिवाच्या आकांताने त्याने पोहून कसेबसे तळ्याचे दुसरे टोक गाठलेच आणि शर्यत जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला. 
     भीतीमुळे थरथर कापत थोडावेळ किना-यावर बसल्यावर तो एकदम रागाने ओरडला, "कोणी मला मागून तळ्यात ढकललं  ते सांगा?" बघतो तर काय, ज्या व्यक्तीने त्याला तळ्यात ढकलले, ती खुद्द त्याचीच बायको होती. त्याच्या बायकोला दृष्टीकोन हा होता की, जिंकले तर 50 लाख, हरले तरी 10 लाख मिळणार होतेच.  
    आणि तेव्हापासूनच ही म्हण अस्तित्वात आली प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.