⚜️प्रस्ताव आणि ठराव⚜️

 ⚜️प्रस्ताव आणि ठराव⚜️

'प्रस्ताव' आणि 'ठराव' हे दोन वेगवेगळ्या अर्थांचे शब्द. पण बहुतेक जण ते वापरताना गल्लत करतात. 'प्रस्तु' पासून 'प्रस्ताव' हा शब्द तयार झाला आहे. 'प्रस्तु' म्हणजे खरी माहिती देणे, असे केले तर योग्य होईल, असं सूचित करणे. अर्थातच एखाद्या गोष्टीची 'पूर्ण कल्पना देऊन तसे केल्यास योग्य ठरेल' अशी शिफारस करणे म्हणजे प्रस्ताव. तर, त्यावर सर्व बाजूंनी विचार करून ती गोष्ट करावी की नाही हे ठरविणे, तसे करण्यास किंवा न करण्यास मान्यता देणे, तशी लेखी नोंद करणे म्हणजे ठराव.
{सार्वजनिक संस्थात असे अनेक ठराव होतात, पण त्यावर काहीच कार्यवाही होत नाही हा तर आपला नित्याचा अनुभव.}