⚜️छत्रपती⚜️

⚜️छत्रपती⚜️  

   'छत्रपती' या शब्दाचं मूळ रूप आहे 'क्षत्रपती.' तैत्तिरीय संहितेत 'क्षत्राणां क्षत्रपतिरसी' असा तो शब्द आला आहे. अर्थातच, हा शब्द संस्कृतोद्भव. नरपति, गजपति, हयपति आणि क्षत्रपति असे चार प्रकारचे राजे हिंदुस्थानात असल्याची व पश्चिम हिंदुस्थानातील राजांना छत्रपती असं बिरुद असल्याची नोंद सहाव्या शतकातल्या 'सी यू कीं'त आढळते. क्षेत्र म्हणजे मुलूख या अर्थानंही राजाला क्षत्रपती म्हटलं जाई. अभिषिक्त राजावर छत्र धरलं जात असे म्हणून त्याला म्हणत छत्रपती. पण या शब्दाचं मूळ आहे ते संस्कृत भाषेतल्या क्षत्रपतीत. 'मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही' हे सभासद बखरीमधील एक वाक्य.