⚜️उंबरा ...उंबरठा⚜️
पूर्वीच्या काळी लाकडी चौकटीला खाली जी पट्टी असायची ती होती उंबराच्या लाकडाची. यज्ञकाळापासूनच उंबराचं लाकूड पवित्र मानलं गेलेलं आहे. हे औदुंबराचं लाकूड टणक आणि टिकावूही; पवित्र आणि अरिष्ट निवारकही समजलं जातं. म्हणून मग त्याची पट्टी चौकटीच्या तळाला वापरली जाई. उंबराच्या लाकडाची ती पट्टी - म्हणून तिला म्हणत उंबरा....उंबरठा.
प्रत्येक घराला अशी चौकट आणि उंबरा असेच. म्हणून मग गावाची ओळखही तशाच शब्दांत सांगितली जाऊ लागली..... शंभर उंबऱ्याचं गाव