⚜️निर्नायक आणि निर्णायक⚜️
'निर्नायक' आणि 'निर्णायक' हे दोन्ही शब्द बहुतेक जण एकाच अर्थाचे म्हणून वापरतात. पण तसं चालणार नाही, कारण त्यांच्या अर्थात खूप फरक आहे. जेव्हा नेतृत्व नसतं म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नेता राहिलेला नसतो अशी स्थिती म्हणजे 'निर्नायक' स्थिती ... नायक नसलेली स्थिती. तर एखाद्या समस्येवर खूप विचार करून घेतलेला निर्णय किंवा निश्चित स्वरूपाचा विचार म्हणजे 'निर्णायक' विचार. त्यावेळची स्थिती म्हणजे 'निर्णायक' स्थिती.