⚜️थारोळे⚜️

⚜️थारोळे⚜️

     जुन्या काळातील गोष्ट आहे. तेव्हा विहिरीतलं पाणी पाजायला मोटा होत्या. बैलजोडी ती मोट ओढायची. मग पाणी विहिरीतून वर आणलं जायचं. हे पाणी वर आणल्यावर ते साठवण्यासाठी हौद असायचा. त्यात ते पाणी साठवलं जायचं. मग तिथून ते पाटामार्फत जमिनीला पाजलं जात असे. तो हौद किंवा पाणी साठवण्याचं ते डबकं म्हणजे थारोळं. त्यात जसं पाणी साठायचं तसं रक्त जमिनीवर साठून राहिलं, की म्हणतात रक्ताचं थारोळं साठलं.