⚜️प्रतिक्रिया आणि अभिप्राय ⚜️

 ⚜️प्रतिक्रिया आणि अभिप्राय ⚜️

      प्रतिक्रिया आणि अभिप्राय हे दोन्ही शब्द वापरताना अनेकांची चूक होते. जर त्यांच्या अर्थांमधला सूक्ष्म फरक ध्यानी घेतला, तर ही चूक आपण टाळू शकतो.
 प्रतिक्रिया:-  एखादी कृती घडली, घटना घडली, की आपण लगेचच कृतीने किंवा उक्तीने व्यक्त होत असतो. अर्थातच, आपलं हे व्यक्त होणं शब्दांतून किंवा कृतीतून असतं. हे असं व्यक्त होणं म्हणजे प्रतिक्रिया.

अभिप्राय :- एखाद्या घटनेविषयी किंवा कृतीविषयी आपण लेखी स्वरूपात व्यक्त होतो, आपलं मत लिहून देतो. आपण असा जो मजकूर लिहून देतो, तो मजकूर म्हणजेच अभिप्राय. 

हा फरक लक्षात ठेवायला हवा.