⚜️शाळेसारखं सुख नाही....!⚜️
मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो,
तोवर दहावीचा शेवटचा पेपर आला.
मी गेलो हायस्कूल सोडून,
माझा वर्गातला बेंच तिथेच राहिला.
बाहेर जाताना कळत नव्हतं,
आता येथे परत येणे नाही.
आयुष्याच्या पानावर मित्रांनो अन् मैत्रिणींनो,
शाळेसारखं सुख नाही.
आता दिवसाला आणतो मी,
खूप सारे पैसे कमवून.
पैसा-पैसा म्हणत-म्हणत,
जातो साऱ्या गर्दीत हरवून
त्या भल्या मोठ्या रक्कमेला,
आईच्या एक रुपयाची सर नाही.
अन् आयुष्याच्या पानावर मित्रांनो,
शाळेसारखं सुख नाही.
अफाट रस्त्यावर आता,
गाडी माझी सुसाट असते.
भली मोठी गाडी पण,
सोबत त्यात कोणीच नसते.
चार चाकीच्या गाडीला मात्र,
मित्रासोबत डब्बल सीट फिरणाऱ्या,
सायकलीची सर येणार नाही,
अन् आयुष्याच्या पानावर मित्रांनो
शाळेसारखं सुख नाही.
कैक हॉटेल आहेत आता,
दुपारचे जेवण करण्यासाठी.
वेगवेगळ्या डिश अन्,
वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी.
त्या सगळ्या जेवणाला मात्र,
मित्रांसोबत शाळेत खालेल्या,
डब्यातील जेवणाची चव नाही.
अन् आयुष्याच्या पानावर मिंत्रानो
शाळेसारखं सुख नाही.
आता झालो मोठे आम्हीं,
कळते आम्हा सर्व.
शाळेतून बाहेर पडल्यावर,
मिटला सारा गर्व.
एक हाती लॅपटॉप अन्,
बॉस कामाचे मेल पाठवतो.
दंग झालेल्या या जिवनात मग,
शाळेचा बेंच पुन्हा आठवतो.
पण जेंव्हा कळायला पाहिजे होते,
तेंव्हा माणसाला कळत नाही.
अन् आयुष्याच्या पानावर मित्रांनो
शाळेसारखं सुख नाही.