⚜️झारी आणि शुक्राचार्य⚜️

⚜️झारी आणि शुक्राचार्य⚜️

    तोंडातून कारंज्यासारखं पाणी सोडणारी झारी 
म्हणजे बागकामासाठी लागणारं एक महत्त्वाचं साधन. या झारीनं मराठीला एक वाक्प्रचारही बहाल केलाय - झारीतले शुक्राचार्य. 
   एखाद्या योजनेचे फायदे सामान्यांना मिळू न देणाऱ्यांबाबत बोलताना तो आपण हमखास वापरतोच. हा वाक्प्रचार आला तो थेट पुराणातून. बळीराजाकडून वामनानं तीन पावलं जमीन मागितल्यावर ती देण्यासाठी त्यावर पाणी सोडावं म्हणून बळीराजानं झारी हाती घेतली परंतु वामनाचा कावा ओळखून दैत्यगुरू 
शुक्राचार्य  त्या झारीच्या तोंडाशी जाऊन बसले. त्या प्रसंगावरून हा वाक्प्रचार अस्तित्वात आला.