⚜️साल, टरफल आणि कवच⚜️

⚜️साल, टरफल आणि कवच⚜️ 

    साल, टरफल आणि कवच हे योग्य शब्द योग्य जागी वापरले नाहीत तर त्या शब्दांचा अर्थच बदलतो. साल, टरफल आणि कवच हे असेच तीन शब्द. हे शब्द फळांशीच संबंधित असले तरी ते कसेही वापरून चालत नाहीत. तिन्ही शब्दांच्या अर्थांमध्ये फरक आहेच. 
  • साल ही फळांच्या गरालगत, मऊ आणि फळाला चिकटलेली असते. ती सोलावी लागते
  • टरफल हे सालीपेक्षा थोडं टणक आणि फळापासून सुटं असतं. ते काढावं लागतं.  
  • कवच त्याहून कठीण असतं. ते तर फोडावचं लागतं. 
  • केळीची ती सालबदामाचं ते कवच आणि भुईमुगाच्या शेंगांची ती टरफलं.