⚜️भगवान परशुराम - भाग - ५⚜️

⚜️भगवान परशुराम - भाग - ५⚜️

          आज आश्रमात महामुनी कश्यप आले होते. कश्यपांनी समोर चरत असलेल्या कामधेनूकडे बघून म्हणाले, इंद्रांनी कामधेनू बरोबर जमदाग्नींना आणखीही एक वर दिला होता. दैदिप्यमान आणि साक्षात विष्णूचा अंश असलेला महापराक्रमी पुत्र भृगु कुळात जमदाग्नीच्या पोटी जन्म घेईल.
           होय. भगवान विष्णूंनी अवतार घ्यावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.हैहय राजाची वाढती अरेरावी आणि भार्गगांवर अन्यायाचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक, भार्गव हे हैहय राजांचे पुरोहित. त्यांचे संबंध पितापुत्रांसारखे असावे, परंतु आतां तसे संबंध राहिले नाही. पौलमीपुत्र शुक्राचार्यांची कन्या देवयानीचा विवाह ययातीशी झाला तेव्हापासून हैहय आणि भार्गवांचा संबंध आला.
       विवस्वान मूनींचा हा श्रेष्ठ हैहय वंश आपल्या मुळ धर्मापासून खूपच दूर गेला. यदु, सहस्रजित, शताजिक, कनक, कृतवीर्याची परंपरा या कुळात सात्विक होती. ऋषीमुनींना ते देवानसमान मानत. विद्येला, ज्ञानाला प्रतिष्ठा होती.
             या हैहय राजांनी करवलेल्या यज्ञात भार्गवांना अमाप दानधर्म केला होता. पण, कार्तवीर्या पासून सारे संदर्भच बदलून गेले. शस्राच्या बळावर आपण कांहीही करुं शकतो ही भावनाच या संघर्षाच्या मुळाशी आहे. कश्यप म्हणाले, आपण प्रमुख भार्गव आहात. आपण कोणती भूमिका घेणार आहात? आणखी किरकोळ बोलणे होऊन कश्यपऋषी निघून गेले.
               एवढ्यात जमदाग्नींनी नवीन औषधीचा शोध लावून आलेले जमदाग्नी म्हणाले, तात, पावसाळ्यात गोमती गंगेच्या पुराच्या पाण्याने या भागातील जनतेला कृमीचा त्रास होऊन पोट बिघडते, त्यावल मी रसायन तयार केले. छाऽन. तुला हा वनौषधीचा नाद लागला. लोक कल्याण हा कोणत्याही ज्ञानाचा आत्मा असतो. मागे सुध्दा तू ऋषीपत्नी आणि ऋषीकन्यांसाठी केशवर्धिनी तेल बनवले होतेस.   
              इतक्यात आश्रमाच्या बाहेर गडबड ऐकू आली. ऋषीकुमार द्यूमत व हर्षयू येऊन म्हणाले, गुरुवर्य, कार्तवीरांचे चार सैनिक आश्रमाजवळ येऊन ऋषीकुमारांबरोबर हुज्जत घालत आहे. कश्यासाठी? त्यांना कामधेनू फक्त बघायची म्हणतात. कुमार संघर्ष हा आपल्या ब्राम्हणांचा धर्म नाही. बघू दे त्यांना कामधेनू. ऋचिक शांतपणे म्हणाले. पण जमदाग्नींना वडिलांची ही भूमिका पटली नाही. मनात म्हणाले, आज हे हैहय सैनिक कामधेनूला पहायचे म्हणतात, ऊद्या तिची मागणी करतील, अशा विचारात असतांना ते म्हणाले, पिताश्री कदाचित हे हैहय, भार्गवांशी कामधेनू पाहण्याचे निमित्य साधण्याचे निमित्य करत नसतील कश्यावरुन?
           ऋचिक शांतपणे म्हणाले, पुत्रा, भार्गवांनी स्वतः कधीच संघर्षाची भूमिका घेतली नाही, आताही घ्यावी असे नाही वाटत. आपल्या पूर्वजांनी हैहय राज घराण्यातील राजपुत्रांना धनुर्विद्या व अस्रशस्राचे ज्ञान दिले आहे परंतु तात, आतां ती परिस्थिती राहिलेली नाही. पितिमह और्वापासूनच या हैहय राजांनी विना कारण संघर्षाची भूमिका घेतली असल्यामुळेच, और्वांनी भार्गव संघटना करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला मी पण थोडा प्रयत्न केला होता. परंतु बाळाऽ, संघर्साने खरा प्रश्न सुटत नाही. जमदाग्नीने पित्याला वंदन करुन अंगणात आले. त्यांचे मन अशुभाच्या चाहूलीने कातर बनले होते.
        कांही दिवसांनी ऋचिक मुनीनी उत्तरेकडे जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. त्यांनी आश्रमातील कर्तव्यदक्ष शिष्य द्युमत व हर्षयूला बोलावून म्हटले, तुम्हा दोघांवर आश्रमाची जबाबदारी व व्यवस्था सोपपवून कांही दिवसांसाठी उत्तरेकडे जायचे ठरवले आहे. सत्यवतीही गेल्या दोन तपांपासून तिकडे गेली नाही. तिलाही मातापित्यांना भेटण्याची ओढ लागली आहे. इथल्या ऋषीकुमारांच्या अध्ययनाची जबाबदारी तुम्हाला सांभाळायची आहे. मी दोन दिवसांनी सत्यवती, जमदग्नी व सारे पुत्रांसह प्रस्थान करणार. आपली आज्ञा शिरसावंद्य म्हणून दोघांनीही त्यांना वाकून नमस्कार केला तेव्हा त्यांच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला व आशिर्वाद दिला.
         जवळ जवळ दोन तपांनी सत्यवतीची भेट आपल्या माता पित्यांशी होत होती. तिला बघून गाधीराजा व माता अजीगाला अत्यंत आनंद झाला. सत्यवतीची सारीच मुले तेजस्वी होती. विशेषतः जमदग्नीला बघून त्यांना अतिशय आनंद झाला. जमदग्नी व त्यांचा पुत्र विश्वामित्र सारख्याच वयाचे. दोघेही पूर्ण विकसित झाले होते. ऋचिकांच्या सानिध्यात जमदग्निचे शिक्षण पूर्ण झाले होते. जमदग्नींनी कांही काळ केवळ वायू भक्षण करुन उग्र तपस्या केल्यामुळे ते जितेंद्रीय तर झाले होतेच पण त्यांचे शब्दाला मंत्रांचे सामर्थ्य प्राप्त झाले होते.
      विश्वामित्रानेही चांगलीच प्रगती केली होती. ऋग्वेद सारख्या सुंदर ऋचा भूजपत्रावर लिहून काढल्या होत्या. या वयातही त्यांनी अग्नीच्या गृहस्थापित, सर्वज्ञ, यज्ञार्ह अशा विविध रुपांचे मानवी जीवनातील योग्य स्थान निश्चित करुन यज्ञसंस्था धर्माला पायाभूत करण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले होते. विश्वाचा मित्र तो विश्वामित्र!