⚜️भंबेरी नव्हे बंबेरी⚜️
'जंगलभ्रमंतीत अचानक वाघोबा समोर आले आणि आमची तर भंबेरी च उडाली ...' सहलीहून परतलेली मुलं सांगत होती. पण यातला भंबेरी हा शब्द चुकीचा आणि अर्थहीन होता हे त्यांना कळत नव्हतं. आपणही सारे जण तसंच म्हणतो आणि लिहितोही. एवढंच कशाला, तो याच स्वरूपात शब्दकोशांतही जागा अडवून बसलाय. मूळ शब्द आहे बंबेरी. बं बं अशी रणभेरी करत भगवान शंकराचे गण जेव्हा शत्रूवर चाल करून जात, तेव्हा शत्रूला पळता भुई थोडी होई. तशा प्रकारची घाबरगुंडी उडाली की म्हणायला हवं... 'त्यांची बंबेरी उडाली.' काळाच्या ओघात आपण या बंबेरी चीच भंबेरी करून टाकली.