⚜️सगेसोयरे⚜️

⚜️सगेसोयरे⚜️

    सगासोयरा म्हणजे नात्यागोत्यातला किंवा नातेवाईक अशा ढोबळ अर्थानं आपण हा शब्द घेतो. या शब्दाचा उल्लेख अगदी थेट मध्ययुगापासून आढळतो. अगदी लीळा चरित्रातही हा शब्द अनेकदा येतो. 
    खरं तर सगा आणि सोयरा या दोन शब्दांचा मिळून तयार झालेला हा शब्द. सगा या शब्दाचा अर्थ आहे 'जन्मानं मिळणारा नातेवाईक,' तर सोयरा या शब्दाचा अर्थ आहे 'आई, वडील आणि बहीणभाऊ यांच्या वर्तुळाबाहेरचा नातेवाईक.' अर्थात, लग्नसंबंधामुळं मिळणारा नातेवाईक. { हल्ली मात्र नातेवाईक हा शब्द तऱ्हेवाईक या शब्दाचा समानार्थी शब्दच असं लोक मानतात.}