⚜️उतारा वाचन भाग १०१⚜️

⚜️उतारा वाचन भाग १०१⚜️

 ब्रह्मदेवाने पशु-पक्षी निर्माण करून त्यांना पृथ्वीवर पाठवताना प्रत्येकाला काहीतरी वैशिष्ट्य दिले. कोकिळेला गोड गळा, मोराला रूप तर सिंहाला शौर्य. माणसाला त्याने असामान्य बुद्धिमत्ता दिली. पण तेवढ्याने संतुष्ट न होता तो ब्रह्मदेवाला म्हणाला, "देवा, मला दोन अदृश्य झोळ्या दे. मी त्या माझ्या गळ्यात अशा अडकवीन की, त्यातली एक माझ्या छातीवर विसावेल, तर दुसरी पाठीवर." " दोन झोळ्या कशासाठी? असा प्रश्न ब्रह्मदेवाने मोठ्या उत्कंठेने विचारला असता माणूस त्याला म्हणाला, " पाठीवरच्या झोळीत मी माझे दोष ठेवून देईन, तर छातीवरच्या झोळीत मी दुसऱ्यांचे दोष ठेवत जाईन." ब्रह्मदेवाने 'तथास्तु' म्हणताच, मनुष्य त्या दोन अदृश्य झोळ्यांसह पृथ्वीवर आला. तेव्हापासून माणसाला स्वतःचे मोठे दोषसुद्धा दिसेनासे झाले, पण दुसऱ्यांचे बारीकसारीक दोष मात्र स्पष्टपणे दिसू लागले !

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा. 

१) पशुपक्षी कोणी निर्माण केले?
२) माणसाला ब्रह्मदेवाने काय दिले?
३) माणसाने ब्रह्मदेवाकडे काय मागितले?
४) माणसाने झोळ्या कुठे अडकवल्या?
५) माणसाने पाठीवरच्या झोळीत काय ठेवून देणार होता?
६) माणूस छातीवरच्या झोळीत काय ठेवत जाणार होता?
७) मनुष्य अदृश्य डोळ्यांसह कुठे आला? ८) ब्रह्मदेवाने वर देताच काय म्हणाले?
९) माणसाला स्वतःचे दोष का दिसत नसतील असे तुला वाटते? १०) माणसाला दुसऱ्याचे बारीक सारी दोष का दिसू लागले असे तुला वाटते?
११) ब्रह्मदेवाने कोकिळेला काय वैशिष्ट्य दिले?
१२) मोराला ब्रह्मदेवाने काय वैशिष्ट्य दिले?
१३) सिंहाला ब्रह्मदेवाने काय वैशिष्ट्ये दिले?
१४) माणसाला ब्रह्मदेवाने काय वैशिष्ट्ये दिले?

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421