⚜️पांढरपेशा⚜️
नोकरदार वर्गाला आपण म्हणतो पांढरपेशा वर्ग. अंग मेहनतीची कामे न करणारा हा वर्ग असाही एक समज. पूर्वी लेखनकाम करणारांसाठी हा शब्द वापरला जायचा. तसं पाहिलं तर हा शब्द आला तो ग्राम संस्कृतीतून.
काळी म्हणजे शेती आणि पांढरी म्हणजे गावठाण. हे गावाचे दोन भाग असत.
ज्यांची कामे काळीशी संबंधित नसून पांढरीशी संबंधित असतात ते लोक म्हणजे पांढरपेशे. म्हणजे यांची कामं लिखापढीशी संबंधित. मग लेखणीशी संबंधित कामं करणारे झाले पांढरपेशे. आजही त्यांच्या संबंधात हा शब्द वापरला जातोच.