⚜️हातात हात पकडला पाहिजे⚜️
⚜️हातात हात पकडला पाहिजे⚜️
- नातं कोणतंही असो, मतभेद कितीही असो, संबध तोडण्याची भाषा मुळीच कधी करू नये.
- प्रत्येक माणूस वेगळा, विचारसरणी वेगळी, मनुष्य जन्मा तुझी कहाणीच आगळी-वेगळी.
- बापा सारखा मुलगा नसतो, मुला सारखी सून नसते, नवरा आणि बायकोचे तरी, कुठे तेवढे पटत असते ?
- जरी नाही पटले तरी, गाडी मात्र हाकायची असते, अबोला धरून विभक्त होऊन, सार गणितं चुकायचे नसते.
- काही धरायचं असतं, काही सोडायचं असतं, एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून एकमेकाला सोडायचं नसतं, चुकल्यावर बोलावं, बोलल्यावर ऐकूण घ्यावं, एकांतात बसल्यावर अंतरंगात डोकवावं राग मनात ठेवला म्हणून कोणाचं भलं झालं का ? बिन फुलाच्या झाडा जवळ पाखरूं कधी आलं का ?
- समोरची व्यक्ती चुकली तरी प्रेम करता आलं पाहिजे. झालं गेलं विसरून जाऊन गच्च मिठी मारली पाहिजे.
- स्वागत होईल न होईल, जाणं येणं चालू ठेवल पाहिजे, समोरचा जरी चुकला तरी म्हणा "खुशाल ठेव देवा त्याला !"
- आयुष्य खूप छोटं आहे, हां हां म्हणता संपुन जाईल. प्रेम करायचं राहिलं म्हणून शेवटी खूप पश्चात्ताप होईल.
- लक्षात ठेवा नात्या पेक्षा दुसरं काहीही मोठं नाही, आपलं माणूस आपल्या जवळ या सारखी श्रीमंती नाही*
- 🌹सर्व, नातलगांना आणि स्नेही मित्र-मैत्रिणींना समर्पित.....