⚜️देवाची भक्ती आणि वैराग्य⚜️
एका राजाच्या मुलीच्या मनात त्यागाची वैराग्याची भावना होती. जेव्हा राजकन्या विवाह योग्य झाली तेव्हा राजाला तिच्या लग्नासाठी योग्य वर सापडला नाही. आपल्या मुलीच्या भावना समजून घेऊन राजाने खूप विचार करून तिचे लग्न एका गरीब साधूशी लावून दिले. राजाला वाटले की फक्त एक साधूच राजकुमारीच्या भावनांची कदर करू शकतो.
लग्नानंतर राजकन्या आनंदाने साधूच्या झोपडीत राहायला आली. झोपडी साफ करताना, राजकुमारीला एका भांड्यात दोन कोरड्या भाकरी दिसल्या. तिने आपल्या साधू पतीला विचारले की येथे भाकरी का ठेवल्या आहेत?
साधूने उत्तर दिले की या भाकरी उद्यासाठी ठेवल्या आहेत, उद्या जेवण मिळाले नाही तर प्रत्येकी एक रोटी खाऊ.
साधूचे हे उत्तर ऐकून राजकन्या हसली. राजकन्या म्हणाली की माझ्या वडिलांनी माझे तुमच्याशी लग्न लावून दिलं कारण त्यांना वाटले की तूम्ही सुद्धा माझ्यासारखा वैरागी आहात, तूम्ही फक्त भक्ती करता आणि उद्याची चिंता करता.
खरा भक्त तोच असतो जो उद्याची चिंता करत नाही आणि त्याची भगवंतावर पूर्ण श्रद्धा व विश्वास असतो. प्राणीसुद्धा दुसऱ्या दिवसाची काळजी करत नाहीत, आपण माणसं आहोत. देवाची इच्छा असेल तर आपल्याला भोजन मिळेल आणि नाही मिळाले तर आपण रात्रभर आनंदाने प्रार्थना करू. हे ऐकून साधूचे डोळे उघडले. त्याची पत्नीच खरी साधू असल्याचे त्याला समजले.
त्या साधूने राजकन्येला सांगितले की तू राजाची मुलगी आहेस, तू राजवाडा सोडून माझ्या छोट्या झोपडीत आली आहेस, मी आधीच एक साधू आहे, तरीही मला उद्याची काळजी चिंता वाटत होती. नुसते बोलून साधू होत नाही, जीवनात संन्यास उतरावा लागतो. तू मला त्यागाचे वैरागाचे महत्त्व समजावलेस.
तात्पर्य :- जर आपण देवाची उपासना प्रार्थना भक्ती करत आहात तर देव सदैव आपल्या पाठीशी आहे असा विश्वासही ठेवायला हवा. तो (देव) आपल्यापेक्षा आपल्या बद्दल अधिक चिंता,काळजी करतो. कधी कधी तुम्ही खूप त्रासलेले असता, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. तुम्ही डोळे बंद करा आणि विश्वासाने पुकार करा, विश्वास ठेवा, थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधान मिळेल..