⚜️ओझं⚜️
एक साधू डोंगरावरील देवीला जात होता. रस्त्याच्या चढणीमुळे थोड्याशा सामानाचे ओझं वाटत होत, अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. थोडं पुढ गेल्यावर एक ७० वर्षाची आदिवासी महिला पाय मोडलेल्या मुलाला, वैद्यकीय उपचारासाठी पाठीवर घेऊन येत होती. ती वृद्धा मोठ्या उत्साहान तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती. साधून विचारलं, आजी इतकं ओझं घेऊन या वयाला उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढ्याशा ओझ्यान हैराण झालो आहे. ती वृद्धा म्हणाली, महाराज ओझं आपण वाहत आहात, हा तर माझा नातू आहे.
बोध - ख-या प्रेमान केलेल्या गोष्टीच ओझं वाटत नाही.