⚜️प्रसंगाचे भान ठेवावे⚜️
एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत.
एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल?
सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.
उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, “हे हंस गोल गोल काय नेत आहेत?” कासव रागावले ते हंसाला म्हणणार होते. “या मूर्खांना एवढेही समजत नाही का?” त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.
तात्पर्यः समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.