⚜️जागतिक महिला दिन ८मार्च⚜️
सावित्री तुम्ही ,निर्भया तुम्ही
तुम्हीच आहात स्वयंसिद्धा...!
अविरत धावपळ दुसऱ्यासाठी,
मुरड मनाच्या इच्छेलासुद्धा...!
आई,पत्नी ,मुलगी,बहिणी
काकू ,आत्या,मामी,वहिनी..!
अशा कितीतरी भूमिका
लीलया साकारतात तुम्ही....!
स्वयंपाक,लादी,भांडी,धुणी
मदतीला नसले जरी कोणी..!
हसतमुखाने सर्व कामे
चुटकीसरशी करतात तुम्ही.…..!
मित्र,आप्तेष्ट,सगेसोयरे,
अपेक्षा करतात सारे....
हसतमुखाने ,निखळ मनाने
नात्याचा गोडवा वाढवीला तुम्ही!
घर ,ऑफिस,नातेवाईक मित्र
शेजारी,गणगोत,आपुलकीचे सूत्र
परस्परांच्या भावना जपून
सगळीकडे साखर पेरली तुम्ही..!
बाजार,किराणा,दळण,कांडण
कधीच कुणाशी नाही भांडण...
जबाबदारीने जीवन जगून,
जगावं कसं शिकवलं तुम्ही..!
अखंड टिकू दे धैर्य तुमचे,
अखंड लाभू दे सौख्य तुम्हांस..!
जागतिक महिला दिनाच्या मनस्वी शुभेच्छा तुम्हास..!