⚜️भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल⚜️
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
गुरु माझं गणगोत गुरु हीच माउली
गुरु स्पर्श दूर करी दुःखाची साउली
गुरुभेटी साठी झाली जीवाची काहिली
भक्त तुझा गुरु देवा पुरता अटल
भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल
गुरु एक तूचि माझा विधाता अचल
गुरुविण सुने सारे विश्व हे सकल
भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल
संगतीनं ओलांडला अवघड घाट
संगतीनं ओलांडला अवघड घाट
चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट
तुझामुळं उमगलो मीच मला थेट
सुख दुःख एका मेका वाटलं वाटलं
भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल