⚜️अक्कल⚜️
एक होता श्रीमंत गृहस्थ. आपल्या अलिशान मोटारीतून तो एकदा निघायला फिरायला . त्याची गाडी वाटेत बंद पडली. त्याने खूप प्रयत्न केला, पण ती काही चालू होईना. जवळच सार्वजनिक टेलिफोन होता. त्या टेलिफोनवरून त्याने मेकॅनिकला फोन केला. मेकॅनिक आला. त्याने बोनेट उघडले. हातातल्या हातोडीने योग्य जागी टोला मारला आणि काय आश्चर्य.... गाडी सुरु झाली.
श्रीमंत गृहस्थाला आनंद झाला. त्याने बिल विचारले. मेकॅनिकलने ते एकशे एक रूपये सांगितले. साधी हातोडी मारण्याचे बिल एकशेएक रुपये ऐकून तो श्रीमंत गृहस्थ रागावला. त्याने बिलाचा तपशील मागितला व तो म्हणाला "हातोडी मारण्याचा फार तर एक रुपया होईल."
मेकॅनिक म्हणाला, अगदी बरोबर! हातोडी मारण्याचा एक रुपया पण जी नेमकी कोठे मारावी या अकलेचे बिल शंभर रुपये"
तात्पर्य : ज्ञानाचे मोल अनमोल असते. जगात अकलेला जास्त किंमत असते.