⚜️माणूस मानसात होता....⚜️

 ⚜️माणूस मानसात होता....⚜️ 

घरात टि.व्ही चं खोकं नव्हतं...
मोबाईल मध्ये डोकं नव्हतं...
काचा कवड्याचा खेळ होता...
नणंद भावजईचा मेळ होता...
गुटक्यानं भिती रंगत नव्हत्या...
ओठांवर ओरीजनल लाली होती...
चंद्राची खळी गाली होती...
वाघासारखा लेक होता...
तवा बाप माणसात होता...
राजकारणात निष्ठा होती...
खरं बोलणाऱ्याची चेष्टा नव्हती...
पैशावर पुढारी फुटत नव्हतं...
तत्वाशिवाय गटत नव्हतं...
प्रेम-माया अटत नव्हती...
चांगली माणसं तुटत नव्हती...
चहा-चिवड्याला रडत नव्हती...
चोरुन पिल्याबिगर चढत नव्हती...
आडाणी नेता भानात होता...
तळातला कार्यकर्ता मनात होता...
सोसायटीचा चेअरमन रानात होता..
तवा माणुस माणसात होता...
गावा शेजारी बार नव्हता...
रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता...
पाठीवर दफ्तराचा भार नव्हता...
अनवाणी पायाला रस्ता  गार होता.
हातावर छडीचा मार होता...
शाळेचा मास्तर दिलदार होता...
तवा पैशाला किंमत नव्हती...
आयुष्य म्हणजे गंमत नव्हती...
घासाघासात कस होता......
म्हणून माणूस मानसात होता....