⚜️ब्रह्मानंद म्हणजे काय ?⚜️
"ब्रह्मानंद" म्हणजे शेवटी काय ? तर (12आनंदांची गोळाबेरीज)
- आई होण्यापेक्षाही... आजी होण्याचा आनंद !
- नातवंडाच्या कृपेने अंगावरील कपडे ओले झाल्याचा वत्सल आनंद ! आणि
- त्यांनी केलेले हट्ट पुरविण्याचा गोड आनंद!
- सूनेने, न मागता आणून दिलेल्या चहाचा व औषध घेतले का..? या प्रेमळ चौकशीचा सात्त्विक आनंद !
- वाढदिवसाला, मुलाने दिलेल्या शालीचा ऊबदार आनंद !
- आपण कुटुंबाला हवे आहोत,या भावनेचा सुप्त आनंद !
- दुपारी जेवणानंतर पेपर वाचता वाचता लागलेली डुलकी .. परमानंद !
- रात्रीची निरव शांतता आराम खुर्चीवर डोळे मिटून पहुडलेल्या क्षणी आपली आवडती गझल रेडिओने गुणगुणावी स्वर्गीय आनंद!
- एखादा लेख किंवा कविता आपण पोस्ट करावी. मित्रांनी त्याला भरभरुन दाद द्यावी...साहित्यानंद !
- मन अशांत असतांना देवघरातल्या भजनामुळे निर्माण होणारा.. कैवल्यानंद !
- भेटलेल्या जुन्या सवंगड्यांच्या भेटीमुळे होणारा अपार आनंद !
- नकारात्मक विचार सोडून दिले की मिळणारा..निर्भेळ आनंद !
या सर्व आनंदाची बेरीज करुन, ती मनाच्या कप्प्यात साठविली की, पडल्यापडल्या लागलेली शांत झोप म्हणजेच... ब्रह्मानंद !!!
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहमदनगर