⚜️योग्य काय?⚜️

⚜️योग्य काय?⚜️


योग्य काय ते तपासलं पाहिजे ?

चांगल्यातलं चांगलं आणि वाईटतलं  वाईट
चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं
योग्य काय ते तपासलं पाहिजे?

खऱ्यातलं खरं आणि खोट्यातलं खोटं
खऱ्यातलं खोटं आणि खोट्यातलं खरं
योग्य काय ते तपासलं पाहिजे?

श्रीमंतातील श्रीमंतआणि गरीबातील गरीब
श्रीमंतातील गरीब आणि गरिबीतील श्रीमंत
योग्य काय ते तपासलं पाहिजे?

माणसातील माणूस आणि राक्षसातील राक्षस
माणसातील राक्षस आणि राक्षसातील माणूस
योग्य काय ते तपासलं पाहिजे?

आपल्यातला आपला आणि आपल्यातला परका
परक्यातला आपला आणि परक्यातला परका
योग्य काय ते तपासलं पाहिजे?

जीवनातील दुःख आणि दुःखातील जीवन
जीवनातला आनंद आणि आनंदातील जीवन
योग्य काय ते तपासलं पाहिजे?