⚜️प्रेमळ बोल...⚜️

 ⚜️प्रेमळ बोल...⚜️ 

एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, "अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत असता, तू असा पळून का जातोस ? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो' यावर तो कोंबडा म्हणाला, "अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले असल्याने, त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही."
तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्याच्या मनात प्रेम असतेच असे नाही तर बऱ्याच वेळा कपटही असते.