⚜️सासूबाईंची एकादशी...⚜️

⚜️सासूबाईंची एकादशी...⚜️

सुनबाई, उद्या आहे माझी एकादशी,
काहीबाही खायला देशिल नाहीतर फटदिशी

तुमच्या भाषेत सांगायचं तर आज माझा आहे फास्ट,
लंच डिनर घेणार नाही, नाही करणार ब्रेकफास्ट.

मसाल्याचं दूध कर केशर वेलची घालून,
बदाम काजू थोडे लाव त्यावर वाटून

वर घाल त्याच्या जाडसर मलई,
साधं दूध मला बिल्कूल आवडत नाही.

फराळासाठी काही साधंसच कर,
फळं चार कापून दे त्याच्या नंतर

सुंठ साखर घाल जरा तुपात भिजत,
सुरणाचा कीस ठेव मंद-मंद शिजत

दाणे घे भाजून आणि जिरं -मिरची वाटून,
मिक्सर नको लावू खलबत्यात घे कूटून

नैवेद्याला कर खमंग शिंगाड्याचे लाडू,
रताळ्याच्या फोडीसोबत तेही पानात वाढू

साबूदाण्याच्या वड्या नंतर पॅटीस थोडे कर,
ओल्या नारळासोबत त्यात काजू बेदाणे भर

शेंगदाणे जपून वापर नाहीतर वाढतं माझं पित्त,
देवाचं नांव घ्यायला शांत असावं लागतं चित्त

राजगिऱ्याच्या पुऱ्यांसोबत  बटाट्याची भाजी,
दाण्यांच्या आमटी सोबत वऱ्याची सोजी.

काकडीची कोशिंबीर आणि चटणी थोडी कर,
आजच्या दिवस हात जरा चालव भरभर

दोन जीवांची आहेस, स्वतःला जप,
उपवास झेपणार नाही तुला जाईल जड,

माझं काय आता सारे झाले आहे,
उपवास मी करीन, तु पाया मलाच पड

झाले गेले सारे शांत झाला एकदाचा पोटोबा,
दर्शन देऊन येते, विटेवर ताटकळतोय.....
केंव्हाचा विठोबा .....


⚜️संकलन ⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर