⚜️अवयवांची गंमत....⚜️

⚜️अवयवांची गंमत....⚜️ 

  • जिभेचे वजन खूप हलके असते पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते. 
  • जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्‍या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो. 
  • पाठ मजबूत ठेवा. कारण शाब्बासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.
  • माणसाने घमेंडीत एवढे उडू नये. एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते हे विसरु नये. 
  • सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात पण एकमेकांना न पाहता. 
  • नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणेपण असावं. कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात. 
  • एकदा हाताने पायांना विचारले, तुझ्यावर सगळे डोके ठेवतात तो अधिकार मला का नाही, त्यावर पाय हसून म्हणाले यासाठी जमिनीवर असावं लागतं, हवेत नाही.
  • दुःखात बोटं अश्रू पुसतात तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात, आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची !
  • जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य पण ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो. 
  • एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली, तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात? त्यावर हारातील फुले म्हणाली त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते. 
  • कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो तेच डोळ्यांना बघायला लावतो.
  • या जगात चपलेशिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही. कारण एक हरवली की दुसऱ्याचं जीवन तिथेच संपते.