⚜️एकमेका सहाय्य करू⚜️
लोक उद्योगी झाल्याशिवाय राष्ट्राचा विकास होत नाही . राजा विलक्षण प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे. पण प्रजा आळशी असल्यामुळे तो चिंतित होता. दरबारातल्या वयोवृद्धांना त्याने विचारले काय करावे म्हणजे प्रजा कार्यप्रवण होईल? तेव्हा एका वृद्धाने सांगितले त्याप्रमाणे त्याने केले.
गजबजलेल्या रस्त्यात एक मोठा दगड ठेवला . जाणारे येणारे दगडाच्या बाजूने जाऊ लागले व दगड ठेवणाऱ्याची निंदा करू लागले. पण दगड हलवण्याचे कोणाच्याही मनात आले नाही. काही दिवसांनी एक माणूस त्या मार्गाने चालला होता. कोणालाही नावे न ठेवता त्याने खूप खटपटीने दगड हलवला. सर्वांची अडचण दूर झाली.
राजाने दरबारात त्याचा सत्कार केला. खूप लोक जमले होते राजा मनाला, “पहा याचे उदाहरण. मी राजा खरा, पण लोकांच्या सहाय्यखेरीज, कष्टा खेरीज मी एकटा राज्य वैभवशाली करू शकणार नाही.” आजही आपण अशाच प्रसंगातून जातो आहोत नाही का ?
तात्पर्य :- एकमेकांना मदत केली तर कामे सोपी होतात.