⚜️माणूस आणि फराळ ⚜️

⚜️माणूस आणि फराळ ⚜️

    माणसं सुद्धा दिवाळीच्या फराळासारखी असतात.
  • काही माणसं चिवड्यासारखं सगळीकडे बेमालूमपणे मिसाळणारी असतात.
  • काही चकलीसारखी स्वतःमध्येच गुरफटलेली असतात.आत्ममग्न असतात.
  • काही लाडूसारखी खुशालचेंडू असतात. जिथे जातील तेथे गोडवा निर्माण करतात.
  • काही शेवेसारखी स्वतःची गुंतागुंत करून कुठून बोलायला सुरवात करावी हे न कळणारी असतात.
  • काही करंजीसारखी बाहेरून चव नसलेली पण एकदा का त्यांच्या अंतरंगात पोहोचली कि सारणासारखी गोड गोड असतात.
  • काही अनारशासारखी समजायला कठीण पण एकदा कळली की मग कधी आपलीशी होतात कळतही नाही.
  • काही शंकरपाळ्यांसारखी कधी गोड, कधी तिखट, कधी खुसखुशीत तर कधी ठाव न कळणारी
  • काही चिरोट्यांसारखी विविध पदर असणारी पण वरून जराशी साखरपेरणी केली की लगेच सामावून घेणारी
  • काही कडबोळ्यांसारखी बाहेरून कडक पण आतून अगदी मोकळ्या स्वभावाची, विचार पटले की लगेच मान्य करणारी
      अशी सर्व माणसं एकत्र आली कि  जे तयार होतं, त्याला मनुष्य स्वभावाचा फराळ म्हणतात.  तो ज्याला खायला जमतो, त्याने आयुष्याची दिवाळी साजरी केली असं म्हणतात.

       
⚜️संकलन⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार 
ता. जि. अहिल्यानगर