⚜️एकात्मिकेची भावना⚜️
एकदा समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताच्या वैयक्तिक पाच बोटांमध्ये खूप जोरात भांडण झाले..... हि पाचही बोटं स्वतःला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ आणि मोठे असल्याचे सिद्ध करण्याचा अनमोल प्रयत्न करत होते.
प्रथम अंगठ्याने सांगितले की मी सर्वात मोठा आहे, माझ्याशिवाय काहीच काम होणार नाही. अंगठ्याच्या पुढील बोटाने, मधल्या बोटाने, तर्जनीने, करंगळीने, सांगितले की आम्ही सर्वात श्रेष्ठ आणि मोठे आहोत. आमच्या किंवा माझ्याशिवाय कोणतीच गोष्ट घडू शकत नाही तसेच प्रत्येक बोट स्वत:ला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होता, परंतु कोणताही निर्णय होऊ शकला नाही तेव्हा सर्व बोटं न्यायालयात गेले.
तद्नंतर न्यायाधीशांनी संपूर्ण प्रकरण ऐकले आणि त्या पाच ही बोटांनां सांगितले कि आपण प्रत्येक बोट कसे महान आहेत हे सिद्ध करण्यास सांगितले.
अंगठा (थंब ) म्हणाला मी सर्वात जास्त शिकलेलो आहे कारण लोक सहीच्या जागी माझ्या अंगठ्याचा वापर करतात.
तद्नंतर अंगठ्या जवळचे बोट म्हटले की लोक मला सहीची ओळख म्हणून वापरतात.
तद्नंतर त्याच्या तिसऱ्या म्हणजे सर्वात मोठे असलेले पुढच्या बोटाने सांगितले की तुम्ही लोकांनी मला मोजले नाही नाहीतर मी सर्वात मोठा आहे. हे कायम लक्षात ठेवा.
तद्नंतर तर्जनीच्या पुढील बोटाने सांगितले, मी सर्वात श्रीमंत आहे कारण लोक माझ्या बोटाने हिरे, रत्ने आणि अंगठ्या घालतात.त्याचप्रमाणे करंगळीने आपले ही महत्त्व पटवून दिले.
म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक बोटाने आप आपले महत्त्व पटवून दिले होते आणि त्या सर्व बोटांचे वेगवेगळे कौतुक केले ही जावू लागले.
या सर्व बोटांचे म्हणने न्यायमूर्तींनी ऐकून घेतले आणि त्यानंतर न्यायमूर्तीनी न्यायालयात आता एक रसगुल्ला मागिविला आणि प्रथम अंगठयाला सांगितले फक्त अंगठ्याने रसगुल्ला उचलायला सांगितला, एकट्या अंगठ्याने खूप प्रयत्न केला पण रसगुल्ला उचलू शकला नाही. यानंतर सर्व बोटांना न्यायमूर्ती नी आदेश दिला प्रत्येक जणांने आपआपल्या फक्त आणि फक्त एका बोटानेच रसगुल्ला उचला..... तद्नंतर एक एक करून प्रत्येक बोट रसगुल्ला उचलण्याचा खूप प्रयत्न केले पण सर्व बोटं अपयशी ठरली.
शेवटी न्यायाधीशांनी सर्वांना एकत्र रसगुल्ला उचलण्याचा आदेश दिला, मग सर्व पाचही बोटांनी एकत्रितपणे मिळून रसगुल्ला उचलला... - आणि निर्णय झाला. न्यायाधीशांनी निकाल दिला की तुमच्या प्रत्येका शिवाय आयुष्यातील सर्व गोष्टी अपूर्ण आहेत. ही गोष्ट सर्वांनी नेहमी लक्षात ठेवा.
म्हणून एकमेकांना आणि तुमचे एकटे राहून शक्तीचे अस्तित्व कधीच नसते, म्हणूनच आयुष्य रुपी जीवनात तरी संघटित राहून तुम्ही आम्ही अगदी अवघड कामे ही सहज सोपी करू शकतो हे त्रिकाल सत्य आहे.
बोध:- खरंच आयुष्यात सामंजस्याने, एकत्रितपणा, सामाजिक बांधिलकी, प्रेम, माया, आणि एकमेकांना आधार देणे हा आपल्या सर्वांच्या आयुष्यात एकमेकांच्या एकत्रित संघटनेत खूप ताकदवान आणि मौल्यवान आहे आणि असतो हिच आपणा सर्वांना नम्रतेची विनंती आहे.
आयुष्य रुपी जीवनात एकात्मिकेची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, व्यक्तीसोबत किंवा संघटनेत अनमोल शक्ती आणि ताकद नक्कीच आहे..!! हे कायम लक्षात ठेवा.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म, सामाजिक बांधिलकी आंधळी आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय आपले अनमोल, बहुमोल जीवन आंधळे आहे. कारण ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; परंतु ज्ञान आणि ज्ञान फक्त तुमचेच रक्षण करू करते हे त्रिकाल सत्य आहे.