⚜️फळ प्रामाणिकतेचे⚜️
एकदा एका शिक्षकाची Teacher Approval ची ऑर्डर एका विहिरीत पडते... तेव्हा शिक्षक विहिरीच्या कडेला रडत बसलेला असतो .. त्यावेळी विहिरीतून एक देवी प्रकट होते.
ती देवी त्याला विचारते... काय झालं ..?
तेव्हा तो शिक्षक देवीला सांगतो की माझी Teacher Approval ची ऑर्डर विहिरीत पडलेली आहे. तेव्हा, ती देवी विहिरीतून Supervisor ड्युटीची ऑर्डर बाहेर काढते. तो शिक्षक प्रामाणिकपणे सांगतो. ही ऑर्डर माझी नाही. पुन्हा देवी दुसरी Election ड्युटीची ऑर्डर काढते. परत तो प्रामाणिकपणे सांगतो. ही पण ऑर्डर माझी नाही. देवी परत विहिरीतून जनगननेची ऑर्डर काढते. परत तो प्रामाणिकपणे सांगतो. ही पण ऑर्डर माझी नाही. देवी चौथ्या वेळी विहिरीतून Covid Duty ची ऑर्डर काढते. शिक्षक प्रामाणिकपणे सांगतो हीसुद्धा ऑर्डर माझी नाही. पाचव्यांदा देवी पोषण आहार सेवेची ऑर्डर काढते ... शिक्षक इतका प्रामाणिक की ही पण ऑर्डर माझी नाही असे सांगतो. देवी पुढे विहिरीतून लसीकरण कार्यक्रमाची ऑर्डर काढते. परत तो प्रामाणिकपणे ही पण ऑर्डर माझी नाही असे सांगतो. सातव्या वेळी देवी विहिरीतून परीक्षा मंडळाच्या कामकाजाची ऑर्डर काढते. शिक्षक कंटाळून सांगतो, ही ऑर्डर माझी नाहीच!
शेवटी शिक्षकाच्या प्रमाणिकतेवर देवी प्रसन्न होते. देवी त्या शिक्षकाची Teacher Approval ची ऑर्डर काढते तेव्हा तो शिक्षक आनंदाने म्हणतो हीच माझी ऑर्डर आहे ....