⚜️आभाळाची अम्ही लेकरे⚜️
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही,llधृ ll
श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकऱ्यांची अमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही ll1ll
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही ll2ll
माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्याविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही ll3ll
कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ-रथ ओढुन नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही ll4ll
- वसंत बापट
गीत ऐकण्यासाठी खालील चित्राला स्पर्श करा.