⚜️राष्ट्रीय विज्ञान दिन⚜️

⚜️राष्ट्रीय विज्ञान दिन⚜️ 

  •  २८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिन
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
      राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि विज्ञानाच्या प्रचारासाठी समर्पित आहे.

  • राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व
👉१. रमण प्रभावाचा शोध –२८ फेब्रुवारी १९२८ रोजी डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांनी "रमण प्रभाव" (Raman Effect) हा शोध लावला. या महत्त्वपूर्ण शोधासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

👉२. भारतातील वैज्ञानिक प्रगतीला चालना – हा दिवस विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवण्यास आणि विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यास मदत करतो.
👉3. सरकारच्या विज्ञानविषयक धोरणांचा प्रचार – विज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम यानिमित्ताने केले जाते.

  • राष्ट्रीय विज्ञान दिनाचा इतिहास
👉१९८६ मध्ये भारत सरकारने २८ फेब्रुवारीला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून घोषित केले.
👉१९८७ पासून हा दिवस औपचारिकपणे साजरा केला जातो.
👉विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST), भारत सरकार, विविध वैज्ञानिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यामध्ये विज्ञानप्रेम वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवतात.


  • डॉ. सी.व्ही. रमण यांचे योगदान
👉त्यांनी प्रकाशाच्या अपवर्तनावर महत्त्वाचा शोध लावला, जो आज विविध वैज्ञानिक संशोधनात वापरला जातो.
👉त्यांच्या संशोधनामुळे स्पेक्ट्रोस्कोपी (spectroscopy) मध्ये महत्त्वाचे योगदान मिळाले.
👉त्यांनी भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISc) संशोधन कार्याला पुढे नेले.

    राष्ट्रीय विज्ञान दिन हा विज्ञानाच्या क्षेत्रातील योगदानाची जाणीव करून देण्याचा आणि नवीन संशोधकांना प्रेरित करण्याचा दिवस आहे. तरुणांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानात पुढे जाऊन नवकल्पना विकसित कराव्यात, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
   सर सी.व्ही. रमण यांना 1930 मध्ये विज्ञान विषयातील संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला विश्व कवी रवींद्रनाथ टागोर यांच्यानंतर नोबेल पुरस्कार (1913) प्राप्त करणारे ते दुसरे भारतीय होते.. रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तो पुरस्कार मिळाला होता. सी व्ही रमण यांना लेनिन शांतता पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता.


🌹(सर सी व्ही रमण यांच्या जीवनाशी संबंधित आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त) 🌹
प्रश्नमंजुषा
       
 1) राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करतात?
उत्तर: 28 फेब्रुवारी

2) कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या सन्मानार्थ 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा करतात?
उत्तर: सर सी. व्ही. रामन

3) राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वर्षीपासून साजरा करण्यात येतो?
उत्तर: इ.स. 1987 पासून

4) 28 फेब्रुवारी 1928 ला सर सी. व्ही. रामन कोणते संशोधन सादर केले?
उत्तर: प्रकाशाच्या विकिरणासंबंधी 'रामन परिणाम'

5) सर सी.व्ही. रामन यांचा जन्म कधी झाला?
उत्तर: 7 नोव्हेंबर 1888*

6) सर सी.व्ही. रामन यांचा जन्म कुठे झाला?
उत्तर: तिरूचिल्लापल्ली, तामिळनाडू

7) सर सी.व्ही.रामन यांना भौतिकशास्त्रातील कोणता सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला? कधी?
उत्तर: नोबेल पुरस्कार, इ. स. 1930

8) भारत सरकारने सी. व्ही. रमण यांना कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले?
उत्तर: भारतरत्न पुरस्कार (1954)

9) सर सी व्ही रमण यांनी इ. स.1917 ते 1933 या दरम्यान कोणत्या विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले?
उत्तर: कोलकाता

10) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय संचालक कोण होते?
उत्तर: सर सी व्ही रमण 1933 साली

11) रामन रिसर्च इन्स्टिट्यूट ची स्थापना कोणी केली? कधी?
उत्तर: सर सी.व्ही. रामण, इ. स. 1948 मध्ये

12) महाराष्ट्रात रमण विज्ञान केंद्र कुठे स्थित आहे?
उत्तर: नागपूर

13) सर सी व्ही रमण यांना नोबेल व्यतिरिक्त मिळालेला महत्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणता?
उत्तर: लेनिन शांतता पुरस्कार (1957)

14) कोणत्या संस्थेमार्फत सी व्ही रमण यांच्या सन्मानार्थ पुरस्कार वितरित करण्यात येते?
उत्तर: रँचो ( रिसर्च अँड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन)

15) 'प्रकाश जेव्हा स्थायू, द्रव किंवा वायुसारख्या पारदर्शक माध्यमातून जाते तेव्हा त्यांचे स्वरूप आणि वर्णन बदलते' हा सिद्धांत कोणी मांडला?
उत्तर: सर सी. व्ही. रामन यांनी

16) सर सी.व्ही. रमण यांचा जन्म कधी झाला?
उत्तर: 7 नोव्हेंबर 1888 रोजी

17) राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला का साजरा केला जातो?

उत्तर: सर सी.व्ही.रमण यांनी प्रकाशाच्या विकीरणाशी संबंधित संशोधन 28 फेब्रुवारी 1928 रोजी जगापुढे मांडले होते म्हणून

18) सर सी.व्ही. रमण यांनी प्रकाशाच्या विकीरणासंबंधीचे कोणते संशोधन केले?
उत्तर: रामन परिणाम

19) सर सी.व्ही. रमण यांना भारतरत्न पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
उत्तर: 1954 साली

20) कोणत्या वर्षी पासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो?
उत्तर: 1987 सालापासून.