⚜️रूपे पैशाची⚜️
पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात.
- शाळेत दिले तर त्याला "फी" म्हणतात.
- लग्नात दिले तर त्याला "हुंडा" म्हणतात.
- घटस्फोटात दिले तर त्याला "पोटगी" म्हणतात.
- दुसऱ्यास दिले तर त्याला "उसने दिले" म्हणतात.
- शासनास दिले तर त्याला "कर" म्हणतात.
- न्यायालयात दिले तर त्याला "दंड" म्हणतात.
- निवृत्त व्यक्तीस दिले तर त्याला "पेंशन" म्हणतात.
- साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले तर त्याला "पगार" म्हणतात.
- मालकाने कामगारास दिले तर त्याला "बोनस" म्हणतात.
- बँकेकडून दिल्यास त्याला "कर्ज" म्हणतात.
- कर्जाची परतफेड होत असताना त्यास "हप्ता" म्हणतात.
- सेवा केल्याबद्दल दिल्यास त्याला "टिप" म्हणतात.
- पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर दिल्यास त्याला "खंडणी" म्हणतात.
- अवैध कामासाठी दिल्यास त्याला "लाच" म्हणतात.
- भाडेकरूने घरमालकास दिल्यास त्याला "भाडे" म्हणतात.
- सामाजिक/धार्मिक कार्यास दिल्यास "देणगी" म्हणतात.
- देवालयास/मंदिरास दिले तर "नवस" म्हणतात.
- लग्नकार्यात दिले तर त्याला "आहेर" म्हणतात.
- पुरोहित,भटजी, पुजाऱ्याने घेतले तर त्याला "दक्षिणा" म्हणतात .
- सर्व पैशांचा ताळमेळ लावला तर "हिशोब" आणि वर्षांचा हिशोब मांडला तर "बजेट" म्हणतात.
- पैसे उरले तर "शिल्लक " आणि कमी पडले तर "तूट."
..,.असा हा पैसा जीवनभर पळवतो.माणूस त्यामागे सदैव धावत असतो. गरीब असो वा श्रीमंत !
●┈┉❀꧁꧂❀┉┈●