⚜️गरज सरो आणि वैद्य मरो⚜️

⚜️गरज सरो आणि वैद्य मरो⚜️

     वैशाख महिना. दोघे प्रवासी प्रवास करीत होते. सूर्य वर येऊ लागला तस तसा त्रास वाढत चालला. त्या रणरणत्या उन्हात चालणे त्यांना असह्य वाटू लागले. उष्मा फारच वाढल्याने प्रवासी हैराण झाले. थोडी का होईना पण सावली आणि घटकाभर विश्रांती मिळण्यासाठी आतुर झाले. दूरवर त्यांना एक झाड दिसलं, पानांनी गच्च भरलेलं त्या सावलीत बसण्यासाठी त्यांनी आपला वेग वाढविला. थंडगार सावलीत बैठक मारली. थोड्या वेळाने ते तेथेच आडवे झाले.
      जागे झाले तोवर ऊन उतरल होत. उठून बसले. एकाच लक्ष वर झाडाकडे गेल म्हणू लागला “अरे, केवढं मोठं आहे हे झाड पण काय कामाचं? ना फूल ना फळ. अगदी निरुपयोगी आहे हे.”
      दुसऱ्यांने त्याचीच री ओढली. म्हणाला, “असलं झाड कोणा मूर्खाने लावलं कोणास ठाऊक, तोडून टाकण्याच्या लायकीचा आहे हे.” त्याचं बोलणं ऐकून झाडाला राग आला त्याची पान जोरात सळसळू लागली. झाड म्हणाल, “मुर्खांनो,एन उन्हाच्या वेळी सावलीसाठी तळमळत होतात. माझ्या आश्रयाला आलात मी थंडगार सावली दिली. ते इतक्यात विसरलात आणि माझ्या जीवावर उठता काय? मी नसतो तर तुमचं काय झालं असतं?”
प्रवासी वरमले त्यांनी न बोलता पुढचा रस्ता पकडला.
तात्पर्य :- आपल्याला मदत हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला गरज संपली की त्याला लाथाडायचं हे चालत नाही.