⚜️ स्पर्धा...⚜️

⚜️ स्पर्धा...⚜️

    एकदा एक कुटुंब त्यांच्या चारचाकी गाडीतून फिरायला चालले होते, वडील गाडी चालवत होते. जाताना त्यांच्या गाडीला २-३ गाड्या ओव्हरटेक करून पुढे गेल्या, ते बघून मुलगा वडिलांना म्हणाला की बाबा स्पीड वाढवा ना ….म्हणून बाबांनी स्पीड वाढवला व पुढील १-२ गाड्यांना ओव्हरटेक केले.
    पुन्हा एका गाडीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले व पुढे निघून गेली म्हणुन त्या मुलाने पुन्हा भुणभुण सुरु केली की … बाबा … स्पीड वाढवा ना … म्हणुन बाबांनी पुन्हा थोडासा स्पीड वाढवला ….
    थोड्याच वेळात अजून १-२ गाड्यांनी त्यांना ओव्हरटेक केले म्हणुन पुन्हा तो मुलगा म्हणाला की बाबा … स्पीड अजून वाढवा ना.
    तेव्हा ते बाबा त्या मुलाकडे बघून हसले व म्हणाले की बाळा,"आपल्या गाडीच्या मानाने आता आपला स्पीड खूपच जास्त आहे, ज्या गाड्या आपल्याला ओव्हरटेक करून जात आहेत, त्या जास्त ताकदीच्या आहेत. त्यांची बरोबरी करायला आपण गेलो तर आपल्या गाडीचे नुकसान होईल. त्यापेक्षा ज्या गाड्यांना आपण मागे टाकले आहे त्यांच्याकडे बघ आणी समाधान मान रे…"
   यावर तो मुलगा म्हणाला, "बाबा हे समीकरण तुम्हाला गाडीच्या बाबतीत कळतंय मग माझ्या अभ्यासाच्या बाबतीत का नाही कळंत ?" 
तात्पर्य :- आज प्रत्येक पालक आपल्या पाल्याला Rat Race मध्ये पळवतोय, पण त्याची बौद्धिक व शारीरिक ताकद याचा अंदाज घ्या व मगच त्याने किती गती ठेवावी हे प्रामाणिकपणे ठरवा …. मग तो अभ्यास असो वा Extracurricular Activities असोत. थोडा स्पीड वाढवायला काहीच हरकत नाही पण दमछाक होईपर्यंत नका पळवु पाल्याला …. बिचारा अर्धाच पल्ला गाठून थकून जाईल !!!