⚜️सत्याची ताकद⚜️

⚜️सत्याची ताकद⚜️ 

    एका छोट्या गावात रोहन नावाचा एक शाळकरी मुलगा राहत होता. तो खूपच हुशार, प्रामाणिक आणि कष्टाळू होता. पण त्याचे काही वर्गमित्र नेहमी त्याची चेष्टा करत, कारण तो नेहमी सत्य बोलायचा.
     एके दिवशी शाळेत एका मुलाच्या पेनाची चोरी झाली. शिक्षकांनी संपूर्ण वर्गाला थांबवले आणि विचारणा केली. सर्वजण गप्प होते, पण रोहन म्हणाला,"सर, मला माहिती आहे कोणी पेन घेतलंय, पण मी त्याचं नाव घेणार नाही, मी आधी त्याच्याशी बोलून त्याला पेन परत द्यायला सांगणार आहे."
    शिक्षकांनी त्याला एक दिवसाची वेळ दिली. त्या संध्याकाळी रोहन त्या मुलाकडे गेला आणि प्रेमाने सांगितलं,"तू घेतलेलं पेन परत दिलंस, तर मी कोणालाही काही सांगणार नाही." 
  त्या मुलाला अपराधाची जाणीव झाली आणि त्याने दुसऱ्या दिवशी पेन शिक्षकांना परत दिलं. शिक्षकांनी रोहनचं कौतुक केलं आणि सांगितलं की,"सत्य बोलण्याची आणि धैर्याने वागण्याची ताकद खूप मोठी असते. रोहनसारखी माणसं समाज बदलू शकतात." त्या दिवसानंतर सर्व मुलं रोहनचा आदर करू लागली.
बोध:-  सत्य बोलणं आणि योग्य गोष्टीसाठी उभं राहणं हे नेहमीच योग्य असतं. सत्याची ताकद शेवटी विजय मिळवून देते.