⚜️गोष्टींचा शनिवार⚜️

 ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️

      राज्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी  'निपूण भारत अभियान' अंतर्गत पायाभूत भाषा साक्षरता संदर्भाने विद्यार्थ्यांचे मराठी भाषा वाचन कौशल्य विकसित व्हावे आणि त्यांच्यामध्ये वाचन अभिरुची निर्माण व्हावी यासाठी *'गोष्टींचा शनिवार'* हा  उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत दर आठवड्याला शनिवारी विद्यार्थी गटनिहाय मराठी भाषेतील गोष्टींची डिजिटल पुस्तक लिंक देण्यात येते. कृपया संबंधित इयत्तेच्या शिक्षकांनी या लिंक द्वारे  आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन डिजिटल /पीडीएफ स्वरूपात पुस्तक वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावे  तसेच  वर्गामध्ये सहभागी वाचन घ्यावे  वाचन झाल्यानंतर त्या वाचनावर आधारित असलेली कृती त्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांकडून पूर्ण होईल असे पाहावे.