⚜️कोण कोण येते?⚜️
माझ्या या दारातून
कोण कोण येते?,
कोण कोण येते?
मामा येतो नि मामी येते
गोड गोड खाऊ देऊन जाते
काका येतो नि काकी येते
छान छान बाहुली देऊन जात
माझ्या या घरातून
कोण कोण येते?,
कोण कोण येते ?
दादा येतो नि वहिनी येते
चणे फुटाणे देऊन जाते
बाबा येतात नि आई येते
गोड गोड पापी घेऊन जाते