⚜️संस्कार⚜️
जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य असे संस्कार बालवयापासून होणे गरजेचे असतात. चांगले काय? आणि वाईट काय? याची जाण लहान बालकांना नसते. बालवयात हळूवार, प्रेमाने, हसतखेळत आनंददायी वातावरणात त्यांच्या नकळत वाढत्या वयाबरोबर त्यांना चांगल्या सवयी लावाव्या लागतात. या सवयी म्हणजेच संस्कार.
या सवयी .......
- ⚜️दात घासणे (ब्रश करणे)
- ⚜️रोज आंघोळ करण्याची सवय
- ⚜️जेवण करण्यापूर्वी आणि नंतर हात धुणे.
- ⚜️पाणी पिण्याची सवय
- ⚜️शांत झोप घेण्याची सवय
- ⚜️अंथरुणाची घडी घालण्याची सवय
- ⚜️आजचे काम आज करण्याची सवय
- ⚜️ध्यानधारणेची सवय
- ⚜️लक्षपूर्वक ऐकण्याची सवय
- ⚜️अभिवादन/नमस्कार करण्याची सवय
- ⚜️गरज असतांना "नाही" म्हण्याची सवय
- ⚜️प्रश्न विचारण्याची सवय
- ⚜️स्क्रीन वेळेची सवय
- ⚜️अभ्यास वेळेवर करण्याची सवय
- ⚜️वाचनाची सवय
- ⚜️कोडे सोडवण्याची सवय
- ⚜️सर्जनशील (Creative) गोष्टी करण्याची सवय
- ⚜️एका ठिकाणी शांत बसण्याची सवय
- ⚜️साधे जीवन जगण्याची सवय
- ⚜️चांगले आणि वाईट लोक ओळखण्याची सवय
- ⚜️कामाचे प्राधान्य ठरवण्याची सवय
- ⚜️खोली स्वच्छ ठेवण्याची सवय
- ⚜️मोठ्यांचा आदर करण्याची सवय
- ⚜️निंदा न करण्याची सवय
- ⚜️इतरांना मदत करण्याची सवय
- ⚜️मित्र जोडण्याची सवय
- ⚜️सत्य बोलण्याची सवय
- ⚜️प्रेमळ शब्द वापरण्याची सवय
- ⚜️शांतपणे बोलण्याची सवय
- ⚜️फोनवर नातेवाईकांशी बोलण्याची सवय
- ⚜️मोठी कामे छोट्या छोट्या टप्प्यात करण्याची सवय
- ⚜️गरज नसतांना Light बंद करण्याची सवय
- ⚜️मदत मागण्याची सवय
- ⚜️ "कृपया" (Please) आणि "धन्यवाद" (Thank You) म्हणण्याची सवय
- ⚜️मध्ये मध्ये न बोलण्याची सवय
- ⚜️क्षमा मागण्याची सवय
- ⚜️प्रतीक्षा करण्याची सवय
- ⚜️वेळ वाया न घालवण्याची सवय
- ⚜️जबाबदारी घेण्याची सवय
- ⚜️वचन पाळण्याची सवय
- ⚜️अपयशातून शिकण्याची सवय
- ⚜️दैनिक दिनचर्या तयार करण्याची सवय
- ⚜️पैसे बचत करण्याची सवय
- ⚜️ध्येय ठरवण्याची सवय
- ⚜️स्वतःचे मत मांडण्याची सवय
- ⚜️देण्याची (शेअरिंगची) सवय
- ⚜️अनोळखी व्यक्तीसोबत न बोलण्याची सवय
- ⚜️रस्त्यावरून चालतांना दोन्ही बाजूने पाहण्याची सवय
- ⚜️औषधावरील अंतिम तारीख तपासण्याची सवय (एक्सपायरी डेट)
- ⚜️नियोजन करण्याची सवय
- ⚜️काम पूर्ण करण्याची सवय