सासरे- जावई दोघे शेतावर गेले.माय-लेकी दोघी त्यांना मागावून भाकरी घेऊन गेल्या.शेतात सासरे - जावई जेवायला बसले. मायलेकी त्यांना वाढू लागल्या.
माय या व्यक्तीने सासरे या व्यक्तीस घास भरवला. ती म्हणाली, "माझ्या बापा तू खा". लेक हि व्यक्ती जावई या व्यक्तीस घास भरवत म्हणाली, "माझ्या बापा तू पण खा".
या माहितीच्या आधारे खालील दोन प्रश्नाची उत्तरे सांगा
प्र.1) माय या व्यक्तीचे जावई या व्यक्तीशी नाते काय ?
प्र.2)सासरे या व्यक्तीचे लेक या व्यक्तीशी नाते काय ?