@ काय होईल ते सांगा @
1) रोपांची
कुंडी अंधारात ठेवली ; तर काय होईल...
(1) रोप सुकेल
(2) रोप जोराने
वाढेल
(3) रोपाला पाणी
जास्त लागणार नाही
(4) रोपांची
वाढ होणार नाही
2) हवेत पाण्याच्या वाफेचे प्रमाण
वाढले ; तर काय होईल...
(1) घाम अधिक येईल
(2) पाऊस पडेल
(3) हवा उष्ण होईल
(4)
हवा दमट होईल
3) पेरणीनंतर खूप पाऊस पडून शेतात पाणी
साठले ; तर काय होईल...
(1) पीक
जोमाने वाढेल
(2) ओला दुष्काळ
पडेल
(3) पेरलेले बी
कुजेल
(4) पिकात तन वाढेल
4) कापूस तयार झाल्यावर पाऊस पडला ;
तर काय होईल...
(1) माती लागून
कापूस खराब होईल
(2) कापूस स्वच्छ
होईल
(3) कापसाचे वजन
वाढेल
(4) कापसातून सरकी
काढणे सोपे जाईल
5) तोंडावर पांघरून घेऊन झोपल्यास ;
तर काय होईल...
(1) झोप
येणार नाही
(2) जीव
गुदमरून जाईल
(3) थंडी वाजणार
नाही
(4) भीती वाटणार
नाही
6) गढूळ पाण्यात तुरटी टाकली ; तर काय होईल...
(1) पाणी
तुरट होईल
(2) पाण्याचा रंग बदलेल
(3) गाळ,जड मातीचे कण तळाशी बसतील
(4) तुरटी गढूळ होईल
7) चहाच्या किटलीच्या कडीवर प्लॅस्टिक
पट्टी बसविल्यास ; तर काय होईल...
(1) किटली
आकर्षक दिसेल
(2) हात भाजणार नाही
(3) चहा थंड होणार नाही.
(4) कडी दिसणार नाही.
8) पिकापर्यंत पाटाने पाणी नेले तर ;
तर काय होईल...
(1) जमीन
अधिक भिजेल
(2) पाणी वाया जाईल
(3) पिके जोमदार वाढतील
(4) जमिनीत पाणी जिरून पिकाला पुरेसे पाणी मिळणार नाही.
9) उघडे अन्न पदार्थ खाल्ले ; तर काय होईल...
(1) अशक्तपणा वाटू लागेल
(2) भूक लागणार नाही
(3) रोग होईल
(4) शालेय जेवणाचा डबा शिल्लक राहील
10) एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ला
; तर काय होईल...
(1) जेवल्यासारखे वाटेल
(2) लाळरस अधिक निर्माण होऊन पचन
चागले होईल
(3) तोंड दुखू लागेल
(4) दात लवकर पडतील
11) धान्य वाळविले नाही ; तर काय होईल...
(1) धान्य अधिक काळ टिकेल
(2) धान्यास कीड लागेल
(3) धान्य बेचव लागेल
(4) धान्याचे वजन वाढेल
12) पेरणीनंतर अनेक दिवस पाऊस पडला
नाही ; तर काय होईल...
(1) पिकांवर रोग पडतील
(2) रोपे जोमाने वाढतील
(3) जमिनीचा कस वाढेल
(4) बिया करपून जातील
13) हृदय बंद पडले ; तर काय होईल...
(1) रक्ताभिसरण थांबेल
(2) माणूस बेशुद्ध होईल
(3) मृत्यू येईल
(4) शरीराला अशुध्द रक्तपुरवठा होईल
14) जमिनीत सतत पीक काढले
; तर काय होईल...
(1) धान्यटंचाई कमी होईल
(2) आर्थिक गुणवत्ता येईल
(3) उत्पादन खर्च वाढेल
(4) जमिनीचा कस कमी होईल
15) घाईघाईने जेवण केले ;
तर काय होईल...
(1) जेवण लवकर होईल
(2) पाणी अधिक पिणे भाग पडेल
(3) अन्नपचन लवकर होईल
(4) ठसका लागेल
16) वनस्पतींची बेसुमार तोड केली ;
तर काय होईल...
(1) दुष्काळ पडेल
(2) उत्पादन घटेल
(3) सावली मिळणार नाही
(4) पर्यावरणाचा समतोल ढळेल
17) धान्य आंबविले ; तर काय होईल...
(1) पौष्टिक घटक तयार होतील
(2) धान्याची नासाडी होईल
(3) धान्य कोणीही खाणार नाही
(4) धान्य बेचव होईल
18) अन्नपदार्थ वाजवीपेक्षा जास्त
शिजवलेतर ; तर काय होईल...
(1) पचनास हलके होतील
(2) अन्नपदार्थातील जीवनसत्वे
नष्ट होतील
(3) अन्न चविष्ट होईल
(4) अन्न अधिक खावेसे वाटेल
19) भाज्या न धुता वापरल्या
; तर काय होईल...
(1) अधिक पोषक द्रव्य मिळतील
(2) आतड्याचे, पोटाचे रोग होतील
(3) भाज्या रुचकर लागतील
(4) भाज्यातील जीवनसत्वे कमी होणार
नाहीत
20) काचेला एका बाजूने काळा कागद
चिकटविला ; तर काय होईल...
(1) काच पारदर्शक होईल
(2) काच अपारदर्शक होईल
(3) काच अर्धपारदर्शक होईल
(4) काळ्या कागदाने अधिक उष्णता शोषली
जाऊन काच तडकेल
❃❃ संकलक ❃❃
श्री .औटी बबन मोहन
जि.प शाळा खांडवी, केंद्र- कोंभळी .
ता.कर्जत,जि.अहमदनगर
☎ ९४२१३३४४२१
=======================
उत्तरे :-
प्रश्न क्रमांक
|
उत्तर क्रमांक
|
1
|
4
|
2
|
4
|
3
|
3
|
4
|
1
|
5
|
2
|
6
|
3
|
7
|
2
|
8
|
4
|
9
|
3
|
10
|
2
|
11
|
2
|
12
|
4
|
13
|
3
|
14
|
4
|
15
|
4
|
16
|
4
|
17
|
1
|
18
|
2
|
19
|
2
|
20
|
4
|