मंत्रालय पास / VISITOR PASS कशी तयार करावी.


मित्रांनो आपणाला ब-याचदा कामकाजानिमीत्त मुंबई येथे मंत्रालयामध्ये जावे लागते.मंत्रालयामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर मंत्रालयाच्या प्रवेश द्वाराजवळ आपणास तासनतास ताटकळत उभे राहून योग्य ते कागदपत्रे सादर करुन प्रवेशिका / Pass तयार करावी लागते. परंतू हिच प्रवेशिका /pass आपण आता आपल्या घरी संगणकावर कींवा मोबाईलवरसुद्धा तयार करु शकतो,ती खालीलप्रमाणे-

१)क्रोम कींवा मोझीला ओपन करुन गुगलमध्ये टाईप करावे.

२)यानंतर mantralay visitor pass management system हे पेज ओपन होईल.याठिकाणी आपणास चार स्टेप पूर्ण करावयाच्या आहेत.
३)मोबाईल नंबरच्या रकाण्यात आपला मोबाईल नंबर टाकावा व SEND OTP  यावर क्लीक करावे.
४)आपल्या मोबाईलवर आलेला ओ टि पी ENTER YOUR OTP या रकाण्यात टाकून व्हेरीफाय करावा.
५) ओ टि पी व्हेरीफाय होताच काही आवश्यक माहीती खालीलप्रमाणे भरावी.
VISITOR NAME -
SENIOR CITIZEN - YES/NO
GOVERNMENT SERVENT - YES/NO
DATE OF VISIT (येथे आपण पुढिल सात दिवसापर्यंतची दिनांक निवडू शकतो )
COUNTRY - 
STATE -
DISTRICT -
DEPARTMENT TO MEET(कोणत्या विभागात काम आहे त्या विभागाचे नाव निवडावे ) -
ID CARD TYPAE ( ADHAR, DRIVING LICENCE, GOVERNMENT ID CARD,PAN CARD,PASSPORT,VOTER CARD ) - 
ID CARD NUMBER - 
OFFICIAL TO MEET(कार्यालयीन काम कोणाशी आहे त्यांचे नाव लिहावे कींवा संबंधिताचे पद लिहावे).
यानंतर
I AGREE TERMS AND CONDITION या ठिकाणी चेक बाॕक्सवर बरोबरीचा मार्क लावून सबमिट बटनावर क्लीक करावे.
यानंतर तुम्हाला भेटिच्या दिवसाचा पास नंबर व टोकन नंबर येईल.सदर टोकन नंबर मंत्रालयातील भेटिच्या दिवसापर्यंत सांभाळून ठेवावा.
मंत्रालयमध्ये भेटिच्या दिवसी सोबत फोटो आयडी असणे  आवश्यक आहे.
अश्याप्रकारे आपण घरबसल्या मंत्रालय व्हीजीटर पास तयार करु शकतो.यासाठी कोणतेही अधिकारी/पदाधिकारी यांच्या शिफारशीची गरज नाही.